HEADER

Home

Cricket

School Mates

Global Music

South Africa

Critics Literature

Memoirs

Contact Us

अनिल गोविलकर ब्लॉग

"मुक्तअ'निल"

 

मुक्तअ'निल

Anil Govilkar receiving AWARD at ABP Majha for Blogger Contest


    ब्लॉगचे नाव "मुक्तअ'निल" ठेवण्यामागील प्रयोजन आणि त्यानिमित्ताने केलेला संवाद. बरेच दिवस ब्लॉगला नाव काय ठेवायचे हेच ठरत नव्हते. एकदा माझा मित्र आनंद मोरेकडे हा विषय काढला आणि त्यानेच हे नाव सुचवले. आनंद खरंच हुशार आहे. वास्तविक माझे लेखनाचे विषय तसे मर्यादित म्हणजे बहुतेक सगळे लेख प्रामुख्याने ४ विभागात मांडले गेले आहेत. १) क्रिकेट - शाळा, कॉलेज पासूनचे वेड आणि पुढे शाळा आणि कॉलेजच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी, यामुळे या खेळातील बरेच बारकावे समजले. मुख्य म्हणजे खेळ बघताना, फक्त खेळ हीच भूमिका कायम राहिली.परिणामी कुठही खेळाडूबद्दल प्रमाणाबाहेर प्रेम वाटले नाही. २) संगीत - घरात लहानपणापासून संगीताचे बाळकडू मिळाले होते. बाबा तबल्यातील जाणकार असल्याने, तालाची समज आणि त्यानिमित्ताने घरी अनेक वादकांचे येणे-जाणे झाल्याने, मनात संगीताबद्दल रुची वाढत गेली. पुढे नोकरीनिमित्ताने दक्षिण आफ्रिकेत सलग १७ वर्षे वास्तव्य झाल्यामुळे पाश्चात्य संगीताशी अतिशय जवळून संबंध आला आणि आपल्याला संगीतात फार काही समजत नाही, या मताला पुष्टी मिळाली. परंतु एक भान सतत राखले, "प्रश्नेन परिप्रश्नेन" ही वृत्ती आजतागायत कायम ठेवली. त्याचा चांगला परिणाम असा झाला, कुठल्याच संगीताविष्काराशी भावनिक नाते जोडले गेले नाही. किंबहुना विश्लेषणात्मक वृत्ती वाढत गेली. ३) दक्षिण आफ्रिका - सुरवातीला ५ वर्षे काढायची याच इच्छेपोटी या देशात १९९४ मध्ये आलो पण पुढे १९९९ मध्ये Permanent Residency मिळाली आणि वास्तव्य वाढत गेले. आता इतकी वर्षे या देशात काढल्यावर असंख्य अनुभव गाठीशी जमा झाले, अनेक व्यक्ती आजही संपर्कात राहिल्या गेल्या. या सगळ्या अनुभवांचे संचित म्हणजे या देशावरील लेख. ४) साहित्यिक समीक्षा - हे वेड मात्र तसे उशिरानेच लागले पण आता रक्तात मुरले, असे म्हणता येईल. वास्तविक या छंदाचे मूळ शोधल्यास, संगीताची विश्लेषक वृत्ती असेच म्हणायला हवे. त्यातूनच साहित्याबद्दलची जाण सजग व्हायला लागली आणि मग, विशेषतः: मराठी कवी आणि कविता, या बाबत वेगळे विचार सुचायला लागले. मुळात, माझ्या वाचनाचा छंद परदेशात राहिल्याने अपरिमित वाढला . ५) हा ब्लॉग जेंव्हा (२०१०) मध्ये लिहायला लागलो तेंव्हा सर्वात आधी माझे बालपणनजरेसमोर आले आणि त्या ओघात जवळपास सुरवातीला ६,७ लेख लिहिले. अर्थात या आठवणी आज लिहायला घेतल्या तर निश्चितच वेगळ्या स्वरूपात लिहिल्या गेल्या असत्या पण वयानुरूप लेखनशैली, घाट. रचनाकौशल्य इत्यादी बदलत जाते. हे बदल चांगले की वाईट, हे माझे मीच कसे ठरवणार? संकोच आड येतो. तेंव्हा तुम्हा वाचकांवर हा प्रश्न सोपवतो आणि इथेच थांबतो.    Copy right © All rights reserved Anil Govilkar Blog  Developed And Managed By Kailas Dingankar